Monday, October 25, 2021

समर्थ कल्याण ट्रस्ट चा उपक्रम जन कल्यानार्थ– अजित टोलकर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

अलीबाग

समाजतील सामाजिक संस्थांनी गोर गरीब जनतेच्या गृह उपयोगी साहित्य वाटप करून त्याची खरोखरची गरज भागविली त्या बद्दल मला माझे हस्ते देताना मला मनापासून आनंद होत आहे याबद्दल मी समर्थ कल्याण ट्रस्ट चा आभारी आहे असे फुलनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रम मध्ये मार्गदर्शन प्रमुख पाहुणे म्हणून अजित टोळकर बोलत होते. यावेळीं कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड भूषण जयपाल पाटील,सन्माननीय पाहुणे म्हणून,जेष्ठ पत्रकार तथा रायगड जिल्हा अध्यक्ष शुभाष म्हात्रे,भारतीय पत्रकार संघ,राजेंद्र गुंजाळ,सचिव, शिवसेना लोकाधिकार समिती आर.सि.एफ.थळ,आर.के.घरतमाजी नगरसेवक तथा महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे कार्यकारिणी सदस्य ,समर्थ कल्याण ट्रस्ट च्याअध्यक्ष कवयित्री सोनम ठाकूर, सचिव कवी निलेश केरकर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पाहुण्यांचे ट्रस्ट तर्फे पुष्पगुच्छ देऊन सोनम ठाकूर व निलेश केरकर यांनी स्वागत केले. यावेळी सोनम ठाकूर म्हणाल्या की ट्रस्ट तर्फे कोकणात चक्री वादळ,महापूर, पाऊस यामुळे अनेक कुटुंबात जगणे कठीण झाले असल्याने माझ्या गुरुजी चे गाव अलिबाग असल्याने आपण येथून अल्प शी मदत करण्याची सुरवात करू यांस आमचे उपाध्यक्ष कवयित्री वैदेही विनायक कुलकर्णी, खजिनदार विनायक कुलकर्णी, सचिव कवी निलेश केरकर यांनी संमती दिली व आमचे परिचित जेष्ठ पत्रकार रायगड भूषण जयपाल पाटील व त्याचे आपत्ती व सुरक्षा मित्र सहकारी यांनी मदत केली.यावेळी जयपाल पाटील म्हणाले की ज्या गरजू कुटुंबाला त्याच्या हातात मदत आणि देणाऱ्या च्या समोर मिळाली की त्याच्या चेहऱ्यावर वरील आनंद पहाता दान केल्याचा आनंद मिळतो यावेळी त्यानी तेथील सर्व बालकांना चॉकलेट वाटली,सर्व पाहुण्याचे हस्ते 22 महिलांना घरगुती सामानाचे बॉक्स रिलायन्स रायगड बाजारातून खरेदी केलेले वाटप करण्यात आले. *फोटो ओळ:-अलिबाग तहसीलदार कार्यालय मधील नायब तहसीलदार तथा,आपत्ती व्यवस्थापन तालुका प्रमुख अजित टोळकर यांचे हस्ते फुलनगर महिलांना घरगुती सामान चे वाटप करण्यात आले,सोबत जयपाल पाटील,सोनम ठाकूर,निलेश केरकर, शुभाष म्हात्रे,राजेंद्र गुंजाळ–छाया, विकास रणपिसे*

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!