Saturday, September 23, 2023

आधारकार्ड संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आता…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आधार कार्ड हे भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने आधार कार्डबाबत काही महिन्यांपूर्वी महत्त्वाची सूचना केली हाेती. ज्यांनी १० वर्षांपूर्वी आधार

नाेंदणी केली आहे आणि त्यात एकदाही बदल केलेला नाही, त्यांनी आधारमधील माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने एक दिलासा दिला आहे. आधारमधील माहिती आता माेफत

हाेणार आहे. १४ जून २०२३ पर्यंत सरकारने हा दिलासा दिला आहे.आधार प्राधिकरण अर्थात ‘युआयडीएआय’ने ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यानुसार, १४ जूनपर्यंत आधार डाक्युमेंट अपडेट करण्याची सुविधा

माेफत केली आहे. हा बदल डिजिटल इंडिया माेहिमेंतर्गत करण्यात येत आहे. ‘आधार’ १० वर्षांपूर्वी काढले असून त्यात कधीही अपडेट केली नसल्यास ओळखपत्र आणि रहिवासाचा पुरावा अपलाेड करणे आवश्यक आहे.

अन्यथा सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागेल.आधार’ अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येत हाेते. मात्र, १० वर्षांमध्ये एकदाही ‘आधार’ अपडेट झाले नसल्यास आता माेफत कागदपत्रे अपलाेड

करून अपडेट करता येणार आहे. नाव, पत्ता किंवा जन्म तारखेत बदल करायच असल्यास नियमित शुल्क द्यावे लागेल. माेफत अपडेट करण्याची सुविधा केवळ माय आधार पाेर्टलवर आहे. ‘आधार’ केंद्रांवर ५० रुपये

शुल्क द्यावे लागेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!