Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील या आजी-माजी सरपंच विरोधात गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ग्रामसभेत अरेरावी शिवीगाळ करणे पारनेर तालुक्यातील जवळे येथील आजी-माजी सरपंच यांना भारी पडले आहे. यामुळे त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

जवळे येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सत्ताधार्‍यांचा तोल सुटल्याने वाद होऊन ग्रामसभा अर्ध्यावर गुंडाळण्याची नामुष्की पदाधिकार्‍यांवर ओढवली होती‌.

मात्र, त्यानंतर काही मोजके ग्रामस्थ यांना हाताशी धरून जवळ्यात चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी भरवलेल्या प्रति ग्रामभेला उत्तर देणे सत्ताधिकार्‍यांनी सुरू ठेवले. यावेळी प्रति ग्रामसभा भरवणारे व त्यांचे पाठीराखे कोण होते त्यांच्याकडे पाहून घेतो, म्हणत प्रति ग्रामसभा

भरवण्यासाठी पुढाकार घेणारे रामदास घावटे यांना यावेळी शिवीगाळ व अपशद्ब वापरण्यात आले. यावेळी या सभेचे फेसबूकवर थेट प्रक्षेपण सुरू होते.दरम्यान घावटे यांनी जवळे गावचा विकास आराखडा तयार करून प्रति ग्रामसभेसमोर ठेवला होता. तसेच सामाजिक हिताचे काही निर्णय घेण्यास ग्रामसभेला सुचवले होते.

यावरून मात्र, सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले होते. या गावात काय करायचे काय नाही ते आम्हीच ठरवणार असे म्हणत ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार न करता अरेरावी करत भर ग्रामसभेत गोंधळ घालत मनमानी केली होती.

ही बाब मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर पसरल्यामुळे चांगल्या सूचना ग्रामसभेत सुचवणार्‍यांचा आवाज दडपल्याप्रकरणी व भावना दुखावल्यामुळे ग्रामसभेत दडपशाही करणारे माजी सरपंच सुभाष भाऊसाहेब आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष, चेअरमन व माजी

सरपंच शिवाजी धोंडीबा सालके, उपसरपंच गोरख शिवाजी पठारे या आजी-माजी सरपंचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!