Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीत होणार पुन्हा बिघाडी ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समनव्यक ज्ञानदेव वाफारे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर,

जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, विधानसभा नेते सुरेश थोरात, शहराध्यक्ष सचिन चौगुले, युवक काँग्रेसचे जिल्हा समन्वयक राजेंद्र बोरुडे, सुभाष सांगळे यांच्या उपस्थितीत आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली.

वाढती महागाई, शिर्डी शहरातील वाढलेली बेरोजगारी, शहरातील सत्ताधारी व प्रस्थापित नेत्यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य शिर्डीकर यांच्याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे शिर्डी शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. याचाच आधार घेत सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व फ्रंटलच्या

अध्यक्षांनी आणि पदाधिकार्‍यांनी शिर्डी नगरपंचायतची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याची मागणी केली असून यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी निवडणूक स्वबळावरच लढविली जाईल सर्वांनी तयारीला लागा, असे आश्वासन दिले.

या बैठकीत युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, अनुसूचित जमाती विभाग, मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्यांक विभाग, उद्योग व व्यापार विभाग, सोशल मीडिया विभाग या सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेत संघटन बांधणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकीला धनाढ्य शक्ती विरुद्ध कशा प्रकारे सामोरे जायचं याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!