Sunday, October 24, 2021

भ्रष्टाचारात नगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचे नाव ? राजकीय वर्तुळात खळबळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याचा ७२ वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचे हस्ते पार पडला .

महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले सरकार आहे. त्यात आता अहमदनगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचाही समावेश आहे, असा आरोप भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या दाव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री, तसेच अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री फरार असल्याची ही पहिलीच घटना आहे. आयकर विभागाच्या धाडीत हजारो कोटींचा भ्रष्टाचार समोर आलाय. अनेक मंत्री यात अडकलेले असुन, कुणाला लक्ष्मी

प्रसन्न झाली, कुणाचे हात सोन्याने पिवळे झाले, हे समोर येणारच आहे. त्यामुळे हे रॅकेट आता उध्वस्त झालेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.भ्रष्टाचार प्रकरणांमुळे महाविकास आघाडी सरकारची एवढी बदनामी झालीय की, या सरकारने सामान्य जनतेचा विश्वास गमावला.

भ्रष्टाचाराची मालिका आणि सरकारचं अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंद करून आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे‌. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हाती आहे.

राज्य सरकारने कितीही नौटंकी केली तरी जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टिकादेखील राधाकृष्ण विखे-पाटलांनी यावेळी केली.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!