Monday, October 25, 2021

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले म्हणून मुख्‍यमंत्री हतबल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या बॉयलर अग्निप्रदिपन सोहळ्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते व आमदार विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधला.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आयकर विभागाने 1 हजार 50 कोटी रुपयांच्‍या समोर आणलेल्‍या घोटाळ्यात राज्यासह जिल्ह्य़ातील ‘कोणाला लक्ष्‍मी प्रसन्‍न झाली आणि कोणाचे हात सोन्‍याने पिवळे झाले’ हे लवकरच समोर येईल असे सूचक विधान करुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

भ्रष्‍टाचाराने बरबटलेल्‍या या सरकारचा रिमोट कंन्‍ट्रोलही आता दुसऱ्यांच्‍या ताब्‍यात गेल्‍याने मुख्‍यमंत्री हतबल झाल्‍याची घणाघाती टिका त्‍यांनी केली.मागील आठवड्यात आयकर विभागाने समोर आणलेल्‍या घोटाळ्यात आधिकारी, दलाल आणि काही मंत्र्यांची नावे असल्‍याची आपली माहीती आहे. त्‍यामुळे

या घोटाळ्यात कोणाला लक्ष्‍मी प्रसन्‍न झाली आणि कोणाचे हात सोन्‍याने पिवळे झाले हे समोर येईलच परंतु हे रॅकेट उघड झाल्‍यास जिल्‍ह्यातील काहींची नावे पुढे आली तर आश्‍चर्य वाटायचे कारण नाही. महाविकास आघाडी सरकारच्‍या कार्यकाळात भ्रष्‍टाचाराची मालिकाच समोर आली आहे. राज्‍याच्‍या

इतिहासात गृहमंत्री फरार झाल्‍याची घटना प्रथमच घडली आहे. यावरूनच या सरकारचा कारभार जनतेच्‍या हिताचा आता राहिला नसल्‍याची टिका आमदार विखे पाटील यांनी केली.केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे संसदेत मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे मार्गदर्शक मात्र त्‍यावेळी सभागृहात काही बोलले नाहीत,

शिवसेनेच्‍या खासदारांनी सोईनुसार गप्‍प बसण्‍याची भूमिका घेतली. आता फक्‍त राजकारणासाठी आपली पोळी भाजून घेण्‍याचे महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्‍न जनतेच्‍याही लक्षात आले आहेत. त्‍यामुळेच मुख्‍यमंत्री हतबल झाल्‍याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!