Monday, October 18, 2021

ती ऑफर नाकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.भाजपसोबत सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रातून ऑफर मिळाल्याची माहिती होती. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”आमच्यासोबत

 सरकार बनवा अशी ऑफर पवारसाहेबांना केंद्राने दिली होती, तर ती ऑफर न स्विकारण्याइतके पवारसाहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनी केंद्रामध्ये सरकार असलेल्या पक्षासोबतच राज्यात सरकार बनविण्यास त्यांनी प्राथमिकता दिली असती.”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यात भाजप सरकार बनविण्यास उत्सुक नाही. आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. पण, शरद पवारांना केंद्रातून ऑफर मिळाली असती तर त्यांना केंद्रामध्ये असलेल्या पक्षासोबतच राज्यात सरकार बनविण्यास प्राथमिकता दिली असती. त्यांना काय म्हणायचं आहे हे सर्वसामान्य माणसांना नीट कळतं,

असेही पाटील म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटतं की मीच मुख्यमंत्री आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत देखील चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. ”आजही जनता मी मुख्यमंत्री असल्यासारखीच अपेक्षा करतात.

मराठवाड्यातील जनतेला असं वाटतं. आजही मला लोकांमध्ये गेल्यानंतर वाटतं की, मीच मुख्यमंत्री आहे. हे उद्धव ठाकरेंना जमत नाही”, असा फडणवीसांच्या बोलण्याचा अर्थ असल्याचे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आमची कोअर कमिटी आमची संघटना लोकशाही तत्वावर चालते. दरमहा आम्ही बसतो. काल आमचे प्रभारी आले होते सीटी रवी. त्यामुळे आमची चर्चा अधिक लांबली, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क यात्रा काढणार आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. आता त्यांच्यावर जनसंपर्क यात्रा काढण्याची वेळ आली आहे का?

सत्ताधारी पक्षाने जनसंपर्क यात्रा काढावी? बरं हे जनसंपर्क यात्रेत काय सांगणार आहेत? पूरग्रस्तांना मदत दिली नाही हे सांगणार की कोव्हीडच्या काळात काहीच मदत केली नाही हे सांगणार?, असा सवालही त्यांनी केला.

काही तरी मिळवण्यासाठी नाराजी
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीतील नाराजी काही तरी ताटात आणखी पाडून घेण्यासाठी असते. त्यामुळे त्यावरून काही तरी निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही, असा टोला त्यांनी हाणला.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!