Monday, October 18, 2021

नगर ब्रेकिंग:सेल्फी जीवावर बेतला, तरुण पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नेहमी पर्यटकांची गर्दी असते.आणि काही अनूचित घटना समोर येत असतात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हरीश्चंद्रगड मध्यावर असणाऱ्या डोहात बुडून औरंगाबाद येथील तरुण पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर मधुकर दांडाइत वय २१ रा. औरंगाबाद असे या तरुणाचे नाव आहे. औरंगाबाद येथील पर्यटक तरुण भटकंतीसाठी हरीश्चंदर गड परिसरात मंगळवारी आले होते. हा गड चढत असताना गडाचा दुसरा टप्पा चढून गेल्यावर काही जण निसर्गाचे फोटो काढत होते तर काही जण सेल्फी घेत होते.

मागील आठवड्यात या परिसरात मुसळधार पाउस कोसळला होता. या परिसरातील ओढे नाले भरून वाहत आहे. या ठिकाणावरील डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज ना आल्यामुळे ज्ञानेश्वरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सोबतीला असणाऱ्या मित्रांनी त्याला बाहेर काढून गडाच्या खाली आणले व वाहनात टाकून राजूरच्या दिशेने निघाले. राजूर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी राजूर येथे वाहन आल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितली.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!