Monday, October 25, 2021

संतापजनक:17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापासह 28 जणांकडून बलात्कार ;बड्या राजकीय नेत्यांचा देखील समावेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापासह 28 जणांनी अमानुष पद्धतीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्यांमध्ये काही बड्या राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे‌.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील आहे. येथील एक 17 वर्षीय पीडित मुलगी इयत्ता सहावीत शिकत असताना, तिच्या वडिलांनी तिला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच घटनेची वाच्यता केल्यास तुला आणि तुझ्या आईला जीवे मारेल अशी धमकी दिली होती.

त्यामुळे पीडितेनं बापाचा अत्याचार निमूटपणे सहन केला. पण काही दिवसानंतर आरोपी बापानं आपल्या पोटच्या लेकीला गुंगीचं औषध देऊन एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. याठिकाणी एका अज्ञाताने पीडितेवर अत्याचार केला.यानंतर पुढील अनेक महिने पीडितेवर वेगवेगळ्या पुरुषांकडून अमानुष पद्धतीने अत्याचार केला आहे.

नराधम आरोपींमध्ये काही नातेवाईक आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यासोबत पीडित मुलीच्या आजीने देखील आरोपींना अत्याचारात मदत केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. शरीरसंबंधास नकार दिल्यास तरुणीला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी नराधम द्यायचे.

अत्याचार सहन केल्यानंतर पीडितेनं अखेर ललितपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असून आरोपी वडिलांसह, ललितपूर सपाचे जिल्हाध्यक्ष,

सपाचे शहराध्यक्ष, बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह तब्बल 28 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!