Friday, October 22, 2021

नगर ब्रेकिंग:या मंदिरात स्त्री-अर्भक सापडलं गावात खळबळ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: स्त्री-भ्रूणहत्येविषयी रोज प्रबोधन केले जात आहे. तरीही त्या हत्या कमी होत नाही. मुलगा- मुलगी समान, असा संदेश दिला जात असला, तरी महिलांना- मुलींना सन्मानाची वागणूक मिळत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील

सावरचोळ येथील गावठाणानजीकच्या मरीमातेच्या मंदिरात सुमारे एक महिना वयाचे स्त्री-अर्भक सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे.ऐन नवरात्रात बेवारस ‘नकुशी’ मरीमातेच्या दाराततुकाराम रामभाऊ कानवडे वस्तीकडून गावाकडे येत असताना,

त्यांनी मंदिरातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला.तेथे कापडात गुंडाळलेले लहान मूल दिसले. त्यांनी पोलिस पाटील संजय कानवडे यांना ही माहिती दिली. त्यांच्यासह सरपंच अनिता कानवडे, संपत कानवडे, किरण, शुभम, दत्ता, अरविंद व अविनाश कानवडे या

युवकांनी व अंगणवाडी सेविका वंदना कानवडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. संगमनेर तालुका पोलिसांनी अर्भकाला उपचारार्थ कॉटेज रुग्णालयात दाखल केले.अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी झाली म्हणून ती मंदिराच्या दारात टाकली, की अनैतिक संबंधातून ती नकोशी झाली,

हे पोलिस तपासात समोर येऊ शकते. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना सोमवार (ता. ११) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!