Wednesday, October 27, 2021

बापरे महाराष्ट्रात कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोविडवर मात करुन बरे झालेल्या रुग्णांमध्ये साईड इफेक्टस दिसून येत होते. हे पोस्ट कोविड म्हणजेच म्युकरमाकोसिस होते. कोविड सोबतच म्युकरमाकोसिस आटोक्यात आलेला असतानाच आता पुण्यातून कोविडमुक्त झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये आता नवीन बुरशी आढळून आली आहे.

गेल्या तीन महिन्यांत अशा प्रकारचे चार रुग्ण आढळून आले आहेत ज्यांच्यात एक वेगळीच बुरशी आढळून आली आहे. आता या नव्या बुरशीमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

कोविडवर मात करुन पूर्ण बरे झालेल्या या रुग्णांना महिन्यानंतर सौम्य ताप आला. तसेच त्यांच्या पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्याच्या तक्रारी आल्या. सुरुवातीला या रुग्णांना स्नायू दुखी बरे होण्यावर औषधे देण्यात आली.

या रुग्णाला जेव्हा औषधांच्या उपचाराचा गुण आला नाही तेव्हा त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. एमआरआय स्कॅनमध्ये स्पॉन्डिलोडायसिटिस आजाराचे संक्रमण झाल्याचं दिसून आलं. यामुळे रुग्णाच्या हाडांवर परिणाम झाल्याचं समोर आलं. तज्ज्ञांनी सांगितले की, याला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस असे म्हटलं जातं.

दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाचे संसर्गजन्य रोग तज्ञ परिक्षित प्रयाग यांनी सांगितले टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, वैद्यकीय भाषेत या आजाराला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस असे म्हणतात. या बुरशीजन्य संसर्गाचे निदान खरणे खूप कठीण आहे. कारण हे पाठीच्य कण्यातील पोकळीत आढळून येतो.

या प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडात आढळतो. फुप्फुसातही बुरशी सापडण्याचे हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!