Friday, October 22, 2021

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना:एकतर्फी प्रेमातूनच त्या कबड्डीपटू मुलीची हत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मंगळवारी सायंकाळी बिबवेवाडीत कबड्डी खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीची कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनं खळबळ उडाली असून, आरोपींनी केलेल्या क्रूर कृत्याबद्दल संतप्त भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडलं असल्याचं समोर आलं असून, पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.पुण्यातील बिबवेवाडी येथे आठवीत शिक्षण घेणारी 14 वर्षीय क्षितिजा व्यवहारे ही मुलगी मंगळवारी सायंकाळी कबड्डीच्या सरावासाठी आली होती. मैत्रिणीसोबत यश लॉन्सवर कबड्डी

 खेळत असताना क्षितिजाच्या नात्यातील हृषिकेश ऊर्फ शुभम भागवत हा त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवरून तिथे आला. कबड्डी खेळत असलेल्या क्षितिजावर त्याने काही समजण्याच्या आतच कोयता आणि चाकूने हल्ला केला.

अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात क्षितिजा गंभीर जखमी झाली. यावेळी आरोपीने तिथे असलेल्या तिच्या मैत्रिणींना धमकी देऊन पळवून लावलं आणि स्वतःही फरार झाला. या घटनेचं वृत्त वाऱ्यासारखं पुणे शहरात पसरलं. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर क्षितिजाला

रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत ती गतप्राण झाली होती.या प्रकरणापासून मुख्य आरोपीसह तिन्ही आऱोपी फरार झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली. आरोपी ह्रषिकेश भागवतसह चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

याप्रकरणाची माहिती देताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, ‘ही घटना प्रेमकरणातून घडलेली आहे. त्याचं एकतर्फी प्रेम होतं. काल सायंकाळी त्यांनी घटनास्थळी जाऊन आणि मुलीला बाजूला घेऊन हत्या केली. हत्येत सहभागी असलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!