Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यात या महिला डॉक्टरांचा प्रताप वाचून तुम्हाला धक्का बसेल; अखेर गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथील रहिवासी असलेल्या डॉक्टर तेजश्री पोपटराव ढवळे यांनी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत असतानाही

प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी याठिकाणी पण समुदाय अधिकारी म्हणून काम करून 40 हजार रुपयांचे मानधन लाटल्या प्रकरणी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच वेळी दोन ठिकाणी शासकीय नोकरी करून त्याची दोन्ही ठिकाणी मानधन घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. मंगळवारी पारनेर पोलिस ठाण्यात भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीची फिर्याद – डॉक्टर संदीप

साहेबराव देठे वय 28 धंदा नोकरी, राहणार – बहिरोबाची वाडी किन्ही ता. पारनेर जिल्हा अहमदनगर हल्ली राहणार प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी यांनी दिली आहे. डॉक्टर तेजश्री पोपटराव ढवळे राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर तेजश्री ढवळे यांनी 3 जुन 2021 ते 30 जुन 2021 रोजी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवंडी व 1 जुन 201 रोजी ते 30 जुन 2021 रोजी दरम्यान उपकेंद्र वडझिरे प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी असे दोन ठिकाणी एकाच वेळी प्राथमिक

आरोग्य केंद्र पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे वैद्यकीय अधिकारी या पदावर शासकीय कर्तव्य बजावून शासनाकडून 40 हजार रुपये मानधन घेतले.  महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्र अळकुटी अंतर्गत समुदाय अधिकारी म्हणून उपकेंद्र वडझिरे येथे देखील शासकीय कर्तव्य करून त्याचा शासनाकडून

मानधन 33 हजार रुपये मोबदला घेतला आहे. यासबंधीचा अधिक तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि काळे करत आहेत.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!