Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना:उपसरपंचाची नदी पात्रात आत्महत्या…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सुरेगाव-गंगा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील वसंत शिंदे (वय 50 वर्षे) यांनी प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सुनील शिंदे यांनी कर्जबाजारीपणा व अतिपावसाने संपूर्ण खरीप पिकाचे नुकसानीला कंटाळून दि.11 ऑक्टोबर रोजी प्रवरासंगम पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली होती.

पुलावर त्यांची मोटारसायकल व चपला सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता निर्माण झाल्याने दि.11 पासून नदी पात्रात शोध सुरू होता.

दोन दिवस मृतदेह सापडला नसल्याने गूढ निर्माण झालेले होते. मात्र आज दि.13 रोजी सकाळी मृतदेह नदीत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने सुनील यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. सुरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!