माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी त्यावेळी दिलीय
ज्यावेळी राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापसाला शेतकऱ्यांचं पांढरं सोनं मानलं जातं. पण या सोन्याला दृष्ट लागली की काय? अशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून
महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. कापसाचा भाव सुरुवातीला दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण हा भाव पुढे वाढण्याऐवजी अतिशय खाली आलाय.
कापसाचा भाव प्रतिक्विंटल अगदी साडेसात ते आठ हजारापर्यंत पोहोचला. त्यामुळे शेतकरी देखील चिंचेत पडले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कापूस घरात पडून आहे. आता भाव वाढेल,
तेव्हा भाव वाढेल या आशेपयी शेतकरी वाट पाहत आहेत. याच आशेमुळे शेतकरी प्रचंड कर्जबाजारी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे घरात साठवून ठेवलेल्या या कापसामुळे घरातील इतरांना त्वचेचे विकार होण्याची
वेळ आली. पण अद्यापही कापसाचे भाव वाढताना दिसत नाहीत. याउलट भाव खाली घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची हाक सरकार कधी ऐकल? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती सांगितली. खरंतर ते अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क विषयी सांगत होते. त्याचवेळी त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा
उल्लेख करत त्यांनाही दिलासा मिळेल, अशी माहिती दिली. “या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी
यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत