Monday, October 25, 2021

आरेरे…शिर्डीचं विमान उतरलं मुंबईत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:चेन्नईहून शिर्डीसाठी आलेले स्पाईस जेटचे विमान (SG 547) बुधवारी (दि. १३) थेट मुंबई विमानतळावर उतरले. या निर्णयामुळे चेन्नईहून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या १२६ प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

कमी दृष्यमानतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे व्यवस्थापक सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी दिली.शिर्डी विमानतळ १० ऑक्टोबर रोजी सुरू झाल्यानंतर बुधवारी ( दि. १३) चेन्नईहून आलेले विमान कमी दृष्यमानतेमुळे मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. या विमानात १२६ प्रवासी होते.

विमान लँडिंग करण्यासाठी ५ हजार मीटरपर्यंत दृष्यमानता गरजेची असते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शिर्डी विमानतळावर ४ हजार मीटपर्यंतच दृश्यमानता होतील. त्यामुळे बराच वेळ घिरट्या घातल्यानंतर वैमानिकाने अखेर मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

कोविड संकटामुळे ऑनलाईन पाससाठी बुकिंग केल्यानंतरच साई मंदिरात प्रवेश मिळतो. विमान मुंबईला लँड करावे लागल्याने या विमानाने आलेल्या साईभक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारची वेळ निर्धारीत झालेल्या अनेक साईभक्तांना मात्र दर्शनापासून वंचित राहावे लागले.

तर काहींवर पुन्हा पास काढण्याची नामुष्की ओढवली. शिर्डीहून चेन्नईसाठी तिकिट बुक केलेल्या प्रवाशांनादेखील मोठा मनस्ताप सहन करत विमानतळावरुनच माघारी परतावे लागले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!