Monday, October 18, 2021

संतापजनक:शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना राष्ट्रवादीच्या आमदाराकडून गंभीर चूक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:वसमत शहरात शिवाजी महाराज यांचा पंचधातूने बनवण्यात आलेला 14 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी जयपूरवरुन हा पुतळा वसमतच्या दिशेनं रवाना झाला होता. आज दुपारी औंढा नागनाथ शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं.

त्यानंतर शिवरायांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाला. जयपूरवरुन या पुतळ्याचं शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

पण यावेळी त्यांच्याकडून एक गंभीर चूक झाली. आमदार राजू नवघरे यांनी अश्वावर उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.राजू नवधरे यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्या मोठयाप्रमाणावर टीका केली जात आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राजू नवघरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यावर कोणत्याही शिवप्रेमीला संताप आल्याशिवाय राहणार नाही. सत्तांध झालेल्या आमदाराचं हे काम आहे, सत्ता किती डोक्यात घुसली आहे, की आपलं दैवत आहे, त्यांच्या अंगावर पाय देऊन तुम्ही उभं राहताय आणि अवमान करताय, याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठची असू शकत नाही,

यामुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, त्यांनी संपूर्ण राज्याची आणि शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे, असं विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.मी तिथे पुष्पगुच्छ वाहिली आणि खाली आलो, माझ्यासोबत सुनील काळे होते, मुंदडासाहेब होते, फक्त माझ्या एकट्याचा पाय तिथे कुठेतरी लावलेला दाखवला जात आहे.

मी कुठे चुकलो असेन तर माफी मागतो. माझी चूक नाहीए असं मला वाटतंय, पण छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत, माझ्या सारखा एखादा कार्यकर्ता आमदार झाला की त्याच्याविरुद्ध सर्वच लोकं पेटून उठयाचं काम करतात. मी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे.

असं सांगत राजू नवघरे यांनी आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केला.मी अठरा पगड जातीला मानणारा कार्यकर्ता आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी येथे होतो तेव्हा खासदारसाहेब होते. माजी आमदार मुंदडा साहेब येथे होते.

मला यांनी वर चढवलं. तुम्ही पहिल्यांदा हार घाला म्हणाले, मला यांनी वर चढवलं, शिवसेनेचे माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडाही वर चढले. पण मला एकट्याला बदनाम केलं जात आहे. माझी चूक झाली असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण मला बदनाम करु नका.

तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातही दाखल होणार नाही”, असं बोलत असताना आमदार राजू नवघरेंना रडू कोसळलं.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!