Friday, October 22, 2021

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : या महिलांना इतक्या आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: केंद्र सरकारनं गर्भपाताशी संबंधित नवीन नियम अधिसूचित केले आहेत. याअंतर्गत विशिष्ट श्रेणीच्या महिलांच्या वैद्यकीय गर्भपातासाठी गर्भधारणेची वेळ-मर्यादा 20 आठवड्यांवरून 24 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

 गर्भधारणेची वैद्यकीय समाप्ती (सुधारणा) नियम, 2021 नुसार, विशेष श्रेणीत लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार किंवा अनैतिकतेला बळी पडलेल्या महिला, अल्पवयीन मुली, ज्या महिलांची वैवाहिक स्थिती गर्भधारणेदरम्यान बदलली आहे (विधवा किंवा घटस्फोटित झाली आहे) आणि ज्या स्त्रियांना अपंगत्व आहे किंवा आले आहे, अशा महिलांचा समावेश आहे.

नवीन नियमानुसार, मानसिकदृष्ट्या आजारी महिला, गर्भाला कोणतीही विकृती किंवा आजार असणं ज्यामुळे मुलाचं किंवा होणाऱ्या आईचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता असते किंवा जन्मानंतर अशा मानसिक किंवा शारीरिक विकृतीची शक्यता असते, गंभीर अपंगत्व येण्याची शक्यता असते, गर्भवती महिला

मानवी संकट क्षेत्र किंवा आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत असल्यास त्यांना या श्रेणीत समाविष्ट केल्याचं सरकारनं घोषित केलंय.नवीन नियमांनुसार, गर्भाला कोणतीही विकृती किंवा रोग आहे, ज्यामुळं त्याचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे किंवा जन्मानंतर, अशा मानसिक किंवा शारीरिक

विकृतीला कारणीभूत असण्याची शक्यता आहे, ज्यामुळं गंभीर अपंगत्व येण्याची शक्यता आहे, या परिस्थितीत 24 आठवड्यानंतर (सहा महिने) गर्भपाताबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य-स्तरीय वैद्यकीय मंडळ स्थापन केलं जाईल.जर एखादी महिला गर्भपाताची विनंती घेऊन आली, तर तिचं आणि तिच्या

अहवालाचं परीक्षण करणं आणि अर्ज प्राप्त झाल्याच्या तीन दिवसांच्या आत गर्भपाताला परवानगी द्यायची की नाही, याबाबत निर्णय देणं हे या वैद्यकीय मंडळाचं काम असेल.

ताज्या बातम्या

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...
error: Content is protected !!