Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साखर सम्राटांच्या विरुद्ध उभे राहावे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेली जागर एफ.आर.पी.चा व आरधाना शक्तिपिठाची ही यात्रा काल (मंगळवार) आली होती. या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. 

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब करपे होते. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, राज्य प्रवक्ते रणजित बागल, अमर कदम, जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे, तालुकाध्यक्ष सतीश पवार, प्रकाश देठे, केशव शिंदे, ज्ञानदेव निमसे उपस्थित होते.

“नीती समितीने तीन बैठका घेऊन, फक्त साखर कारखानदारांचे ऐकून घेतले. शेतकऱ्यांची बाजू ऐकली नाही. कृषी मूल्य आयोगाचा अहवाल घेऊन, केंद्र सरकारकडे एफआरपीचे तीन तुकडे करण्याची शिफारस केली. कृषिमूल्य आयोगाने चोंबडेपणा करून, एफआरपीचे तुकडे करण्याचा अभिप्राय दिला.

राज्यात 200 पैकी शंभर कारखाने खासगी आहेत. उत्तर प्रदेशात कॉर्पोरेट कंपन्यांचे साखर कारखाने आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे पैसे वापरायचे आहेत. त्यासाठी कारस्थान रचले आहे.”जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे विजयादशमीच्या दिवशी ऊस परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल.

राज्यात आंदोलन होते. नगर जिल्हा बघत राहतो. असे यापुढे चालणार नाही. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साखर सम्राटांच्या विरुद्ध उभे राहावे. आपल्या तरुण मुलांना संघर्षात स्वाभिमानीच्या पाठीशी उभे करावे. शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या कमकुवत, लाचार, हतबल करून राजकारण करण्याचे कारस्थान उधळून लावावे.” असे आवाहन शेट्टी यांनी केले.

रविकांत तुपकर म्हणाले, “टाकळीमिया हे चळवळीला, उभारी देणारे गाव आहे. स्वाभिमानीचे चळवळीतील खंदे कार्यकर्ते रवींद्र मोरे यांच्या पाठीशी गाव उभे आहे. याचे समाधान आहे. नगर जिल्हा चळवळीत कायम अग्रभागी असतो. परंतु, शेतकऱ्यांच्या चळवळीत मागे पडला आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना

 साखर उद्योगातील नेते मोठे वाटतात. त्यांनी लुटले तरी त्यांच्या मागे राहतात. त्यामुळे, नगर जिल्ह्यात सांगली, सातारा, कोल्हापूरच्या तुलनेत एक हजार रुपये ऊसदर कमी मिळतो. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस दराच्या प्रश्नावर लढले पाहिजे असे शेट्टी म्हणाले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!