नेवासा
शनिशिंगणापुर येथे भाविकांचे पैसे चोरणा-या वाहन चालकास मुद्देमालासह अटक शनिशिंगणापुर अटक केली आहे.
नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापुर पोस्टे गुरंन 57/2023 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हाबाबत फिर्यादी नामे तरुण खेमचंद मोटवाणी (वय 34वर्ष) धंदा-फटाके विक्री व्यवसाय रा-C-19/15S-2-1 बादशाह बाग कॉलनी ता. जि. वाराणसी,राज्य उत्तरप्रदेश हे चुलत भाऊ व मित्र याचेसह समक्ष पोलिस स्टेशनला येवुन फिर्याद दिली की दि.१७ मार्च २०२३ रोजी सकाळी ९:३० वाजेचे सुमारास शिर्डी येथून गाडी नं.एमएच १७ सीए ९९९० ही जी-स्वेअर टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स शिर्डी येथुन भाड्याने करुन शनिशिंगणापुर येथे दर्शनासाठी केली होती. सदर फिर्यादी हे ११ वाजेचे सुमारास शनिशिंगणापुर येथे दर्शनासाठी आले असता त्यांनी आपले कडील बॅग व इतर सामान गाडीमध्ये ठेवुन दर्शनासाठी गेले होते. दर्शन करुन बाहेर येवुन त्यांनी बॅगेत असलेले पैसे पाहीले असता त्यांना त्यांचे बँगत ठेवलेले पैसे दिसुन आले नाहीत. सदर ड्रायव्हर यास बॅग कोणी खोलली असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. तेव्हा त्यांची पैसे चोरी गेल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन दिलेल्या फिर्यादीवरुन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सदर गाडी चालकास पोलिस स्टेशनला आणुन विचारपुस केली असता त्याने सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु नंतर विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गाडीचा ड्रायव्हर नामे भाऊसाहेब पोपट कोळपे याने त्याचे ताब्यातील इनोव्हा क्रिस्टा कार नं. एमएच १७ सीए ९९९० या कारचे ड्रायव्हर सीटच्या आतमध्ये लपवुन ठेवलेले रु.३० हजार रोख रक्कम काढुन दिले आहे. सदरची गाडी ही गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आली आहे. सदर ड्रायव्हर यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे.
यात ३० हजार रुपये रोख रक्कम व १५ लाख रुपये किंमतीची इनोव्हा क्रिस्टा कार असा १५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल ताब्यात हस्तगत केला आहे.
पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक डॉ. स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभाग संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापुर पोलिस स्टेशनचे सपोनि राम कर्पे, सफौ सप्तर्षी, सफौ कांबळे, पोहेकाँ खैरे, पोना लबडे, चापोकॉ म्हस्के, पोकों ठुबे, मपोकॉ गोरे यांनी केली आहे पुढील तपास सफौ एन.पी. सप्तर्षी हे करीत आहे.