Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यात कांदा ५००० हजाराच्या पुढे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये मंगळवारी 5 हजार 300 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. 2021 या वर्षातील हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव आहे.

कांद्याची एकूण 33 हजार 144 गोण्या (18 हजार 565 क्विंटल) इतकी आवक झाली. मोठ्या मालाला 3800 ते 4000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 3400 ते 3500 रुपये, मध्यम मालाला 3200 ते 3400 रुपये, गोल्टी कांद्याला 2900 ते 3500 रुपये, जोड कांद्याला 600 ते 700 रुपये भाव मिळाला. तीन ते चार वक्कलांना 5100 ते 5300 रुपये इतका भाव मिंळाला आहे

तर राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे अडीच हजार कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या भावात मंगळवारच्या तुलनेत आज घसरण झाली. एक नंबर कांद्याला अवघा 4205 रुपयांचा भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत कांद्याच्या दोन हजार 613 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला आज 4205 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला.

प्रतवारीनुसार मिळालेले कांद्याचे भाव ः एक नंबर कांदा ः 3700 ते 4205, दोन नंबर ः 2550 ते 3650, तीन नंबर कांदा ः 1300 ते 2500, गोल्टी कांदा ः 2600 ते 2900, जोड कांदा ः 300 ते 1200.

शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे. कांद्याच्या भावात वाढ होऊ लागल्याने शेतकर्य़ांमध्ये आनंदाचे वातावण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...
error: Content is protected !!