Monday, October 25, 2021

इथेनॉल विषयक इथेनॉल निर्मिती व अंमलबजावणी धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे अध्यख्यतेखाली राज्यात इथेनॉल विषयक इथेनॉल निर्मिती व त्याची अंमलबजावणीचे धोरण ठरविण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.

याबाबद राज्य सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.त्यात म्हंटले आहे की, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.7 ऑक्टोबर 2021 रोजी नाबार्डचे अध्यक्ष व नाबार्ड मुख्यालयातील अधिका-यांशी विविध विषयांवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. सदर

चर्चेदरम्यान राज्यात इथेनॉल चे धोरण ठरविण्याबाबत तसेच साखर कारखान्यांकडून 100 टक्के इथेनॉलचे उत्पादन करण्याबाबतचा मुद्दा अध्यक्ष, नाबार्ड यांनी उपस्थित केला. त्या अनुषंगाने सहकार विभागाकडून इथेनॉल विषयक इथेनॉल निर्मिती व त्याची अंमलबजावणी धोरण ठरविण्यात यावे असे

मा. मुख्य सचिव यांनी मा. मुख्यमंत्री महादेयांच्या सूचनेनुसार निर्देशित केले. सबब, इथेनॉल विषयक इथेनॉल निर्मिती व त्याची अंमलबजावणी याचे धोरण ठरविण्यासाठी आयुक्त साखर, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची शासनाचे विचाराधीन होती.

त्यानुसार राज्यात इथेनॉल विषयक इथेनॉल निर्मिती व त्याची अंमलबजावणी याचे धोरण ठरविण्याबाबत समिती गठित करण्यात येत आहे.

या समितीची रचना खालीलप्रमाणे राहील..

* अध्यक्ष:- श्री.शेखर गायकवाड,आयुक्त साखर, महाराष्ट्र राज्य, पुणे

* सदस्य:-श्री. संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, लि. मुंबई,

* सदस्य:- श्री. बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्टइंडियन शुगर मिल असोसिएशन (WISMA) पुणे

* सदस्य:- प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, तांत्रिक सल्लागार व विभाग प्रमुख
(मद्यार्क तंत्रज्ञान व जैव इंधन विभाग) वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, मांजरी, पुणे

* सदस्य सचिव:- डॉ. संजय भोसले, सहसंचालक (उपपदार्थ), साखर आयुक्त कार्यालय, पुणे

समितीची कार्यक्षा:-
केंद्रशासन आणि ऑईल मार्केटिंग यांचे इथेनॉल निर्मिती व पुरवठा याबाबतचे उदिष्टे पूर्ण होण्याच्या दृष्टीने साखर कारखाने व आसवणी प्रकल्प यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी धोरण ठरविणे.केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाचे इथेनॉल निर्मिती आणि पुरवठयाबाबत धोरण ठरविणे.

• महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाने आणि आसवणी प्रकल्प यांची क्षमता वाढ करुन पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी आवश्यक आराखडा तयार करणे.
समितीने दोन महिन्यात शासनास अहवाल सादर करावयाचा आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!