Monday, October 25, 2021

जुने वाहन खरेदी करताय? हा पुरावा घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जुने वाहन खरेदी करताना केवळ ‘एनओसी’ नको, मूळ नोंदणीतील टॅक्‍स पावती घ्या, अन्यथा विक्री किंवा नूतनीकरण करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. २०१४ पासून राज्यात ‘वाहन’ ही ऑनलाईन सिस्टीम सुरू झाली.

तत्पूर्वी परजिल्ह्यातील वाहन खरेदी केवळ एनओसी (नो ऑब्‍जेक्शन सर्टिफिकेट) घेऊन वाहन ट्रान्स्‍फर (हस्तांतर) होत होते; मात्र सध्या त्या वेळची म्हणजेच ज्या ठिकाणी मूळ वाहन खरेदी केले आहे, अशा शहरातील टॅक्स भरलेली पावती आवश्‍यक आहे. जोपर्यंत ही पावती मिळत नाही, तोपर्यंत तुमचे वाहन

विक्री करता येत नाही. तसेच तुमच्या वाहनाचे नूतनीकरण करता येत नाही.स्क्रॅप पॉलिसी लागू झाल्यामुळे कमर्शिअल वाहन १५, तर खासगी २० वर्षांनंतर कायमचे निकामी करावे लागणार आहे. जुन्या वाहनातील कागदपत्रांत बदल करताना तुमच्याकडे ज्या ठिकाणी वाहन मूळ खरेदी (रजिस्टर) झाले आहे,

त्या ठिकाणाची टॅक्स भरलेली पावती लागतेच. कारण सध्या ‘वाहन’ या ऑनलाईन सिस्टीममध्ये नवीन नोंदणी करताना टॅक्स हा कॉलम भरल्याशिवाय त्याची प्रक्रियाच पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्यांनी २०१४ पूर्वी परजिल्ह्यातून केवळ ‘एनओसी’ वरून वाहन खरेदी केले आहे त्यांना आता वाहनातील बदलासाठी धावाधाव करावी लागत आहे.

एखाद्या एजंटाकडून असे व्यवहार होतात. येथील मालकाला वाहनाचा मूळ मालक कोण हे प्रत्यक्षात माहितीही नसते. केवळ एनओसीमुळे असे व्यवहार होतात. प्रत्यक्षात असे व्यवहार केलेल्या वाहन मालकांना आता वाहन विक्री करताना मूळ टॅक्स पावती आणणे जिकिरीचे ठरत आहे. प्रादेशिक परिवहन

कार्यालयातील (आरटीओ) अधिकाऱ्यांकडून संबंधित कार्यालयाकडे (मूळ वाहन जेथे नोंद आहे) पत्रव्यवहार (ईमेल) केला जातो. काही वेळा मालकालाच यासाठी धडपड करावी लागते.वाहन या ऑनलाईन सिस्टीममुळे २०१४ पूर्वीच्या वाहनांची टॅक्स पावती आवश्‍यक आहे. त्याशिवाय नवीन नोंदी होत नाहीत.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!