Monday, October 25, 2021

भाजप व महाआघाडी म्हणजे ‘चोर-चोर मावसभाऊ, सारे मिळून वाटून खाऊ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘जागर एफआरपीचा व आराधना शक्तिपीठाची’ ही यात्रा आज (बुधवारी) गणोरे येथे आली होती. या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.भाजप व महाआघाडी म्हणजे ‘चोर-चोर मावसभाऊ, सारे मिळून वाटून खाऊ.’ देशातील मंत्र्यांचे राज्य सरकार, तर केंद्रातील सरकार राज्यातील उपमुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पाडत आहे.

त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून त्यांचे हे उद्योग सुरू आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.शेट्टी म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी एका बाजूने अस्मानी, तर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे सुलतानी संकटात सापडला आहे.

कोल्हापूर, सांगली भागात उसाला तीन हजार दोनशे रुपये भाव मिळत असताना तुमच्याकडे १७०० ते २१०० रुपये, असा दर दिला जात आहे. याला तुम्हीच जबाबदार आहात. केंद्र सरकारने पूर्वीचा ‘एफआरपी’चे पैसे एकर कमी देण्याचा निर्णय बदलून आता त्याचे तीन तुकडे पाडून कारखानदारांना एक प्रकारे

पळवाट दिली आहे. आघाडी सरकार शेवटचा तुकडा एक वर्षानी मिळावा, यासाठी साथ देत आहे. शेतकऱ्यांना लढाई लढावी लागणार आहे. तीन पायांचे सरकारही सामील कायदा एकरकमी ‘एफआरपी’ देण्याचा असूनही एक वर्षापासून एकरकमी पैसे देऊ शकलेले नाहीत.

तीन तुकडे करून तुमच्या पदरात पैसे कधी पडतील याचा विचार करा. यासाठी राज्यातील तीन पायांचे सरकारदेखील सामील आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या

धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी सुरवातीला शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष शुभम आंबरे यांनी स्वगत केले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!