Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यातील त्या’ मुलीच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात नोंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील अल्पवयीन मुलीच्या संशयीत मृत्यूप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हवालदार आप्पासाहेब वैद्य यांनी याबाबत पाथर्डी पोलीस

ठाण्यात फिर्याद दिली असून आता या घटनेच्या तपासाला अधिक गती होणार आहे.दरम्यान आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी अल्पवयीन मुलीच्या चारित्र्याच्या संशयावरून जीवे ठार मारून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याबाबत तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंडे यांनी मंगळवारी तिसगाव येथे भेट देऊन मयत मुलीच्या आई, वडिलांसह कुटुंबातील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामध्ये मुलीवर उपचार करणार्‍या डॉक्टराचाही समावेश होता. बुधवारी दिवसभर चौकशी सुरू होती.

दरम्यान आपचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी अल्पवयीन मुलीच्या चारित्र्याच्या संशयावरून जीवे ठार मारून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून पुरावे नष्ट केल्याबाबत तक्रार करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंडे यांनी मंगळवारी तिसगाव येथे भेट देऊन

मयत मुलीच्या आई, वडिलांसह कुटुंबातील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यामध्ये मुलीवर उपचार करणार्‍या डॉक्टराचाही समावेश होता. बुधवारी दिवसभर चौकशी सुरू होती.हा प्रकार माध्यमासमोर आल्याने पोलीस दल खडबडून जागा झाला. सरकारी पक्षाच्या हवालदार वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,

जालिंदर पंढरीनाथ गारुडकर (रा.तिसगाव) यांच्या अल्पवयीन मुलीस 15 जून 2021 रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिस पाथर्डी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले. त्यांनतर पुन्हा तिसगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये स्वॅबची चाचणी केली. ती निगेटिव्ह आली.

दुसर्‍या दिवशी दि. 16 जून रोजी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून मुलीस घरी आणले. त्यादिवशी रात्री पुन्हा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या व औषधे दिल्यांनतर मुलगी आपल्या खोलीत जाऊन झोपली. दि. 17 च्या पहाटे

मयत मुलीचे वडील मुलीला उठवण्यास गेले. तिने काहीच हालचाल केली नाही. त्यानंतर घरातील सर्वांना बोलावून मुलीचे शरीर थंड पडले असून मुलगी मयत झाल्याबाबत गावातील नातेवाईकांना फोनवरून कळवण्यात आले. सकाळी नातेवाईक आणि गावातील लोकांच्या उपस्थितीत तिसगावतील

मांडवे रस्त्यावरील त्यांच्या मालकीच्या शेतात मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी तपासात माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!