Friday, October 22, 2021

नगर जिल्ह्यातील प्रकार:नदीपात्रातच रात्री दोनच्या सुमारास प्रेमीयुगुलांची कुटुंबाकडून चांगली धुलाई अन् पुढे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक तरुण आणि राहुरी तालुक्यातील एक तरुणी यांचे विद्यार्थीदशेतच सूत जमलेले होते. त्यांनी नदीपात्रात भेटण्यासाठी फोनाफोनी केली.अन् पुढे प्रवरा नदीपात्रात

रात्री दोनच्या सुमारास अंधार्‍या रात्री प्रेमीयुगुलांची तरुणीच्या कुटुंबाने यथेच्छ धुलाई केली. दरम्यान, कुटुंबाने त्या तरुणीला घरी घेऊन गेल्यानंतर तरुणाने नदीपात्रातील विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेच वाळू उपसा करणार्‍या तस्करांनी त्या तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त करून त्याच्या घरी पाठवून दिले.

ही घटना राहुरी तालुक्याच्या उत्तरेकडील प्रवरा नदीकाठच्या गावात घडली.ठरल्या वेळेप्रमाणे त्यांची नदीपात्रात भेट झाली. त्याचवेळी त्या तरुणीच्या कुटुंबाला या प्रकरणाचा कानोसा लागला. त्यांनी तातडीने नदीपात्र गाठले. त्या दोघांचीही बेदम धुलाई करून ते तरुणीला घरी घेऊन गेले. याचवेळी नदीपात्रातील गोंगाटाने एव्हाना सारा गाव जागा झाला होता.

दरम्यान, हताश झालेल्या त्या तरुणाने जवळच्याच विहिरीत आत्महत्या करण्यासाठी आपला मोर्चा वळविला. त्याचवेळी वाळूतस्करी करताना नदीपात्रातील तमाशा लांबून पाहणार्‍या तस्करांनी त्या तरुणाचे प्रबोधन केले. नंतर त्याला त्याच्या घरचा रस्ता दाखविला. या घटनेची जोरदार खमंगपणे चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!