Friday, March 24, 2023

नेवासा तहसील मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
Shadow

नेवासा

नेवासा तहसील कार्यालय येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व राष्ट्रीय आपत्ती दल (एनडीआरएफ) पुणे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

या बाबद सविस्तर माहिती अशी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल(एनडीआरएफ) पुणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने
नेवासा तहसील कार्यालय येथे दि.१७ मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रथमोपचार पद्धत यांचे प्रशिक्षण देण्यात आले. मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीच्या काळात कशाप्रकारे आपली पुर्व तयारी असली पाहिजे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पुर,भुकंप, रस्ते अपघात, चक्रीवादळ, यांसारख्या आपत्तीच्या काळात कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी माहिती देण्यात आली. आज सगळीकडे ह्दय विकाराने अनेक जणांचे मृत्यू होत आहेत.एखद्या व्यक्तीला ह्दय विकाराचा झटका आल्यानंतर त्या पेशंट ला (प्रैढ व्यक्तीला) CPR कशा पद्धतीने दिला पाहिजे, त्याचबरोबर लहान मुलांना CPR कसा द्यावा लागतो या विषयावर मार्गदर्शन तसेच प्रत्यशिके यावेळी दाखवण्यात आले.
आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे याविषयी माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण वेळी आपदा मित्रांनी ही CPR विषयी प्रत्यशिके सादर केली.

या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय दिघे, एनडीआरएफचे निरीक्षक जालिंदर फुंदे,नितीश कुमार, मेजर विकास राऊत, मेजर घाटगे विजय, मेजर स्वप्नील पाटील, संतोष औताडे , आपदा मित्रअजय शेलार, ज्ञानेश्वर दहिफळे, आपदा सखी हर्षदा शिंदे, वैश्नवी नवले तसेच ज्ञानोदय महाविद्यालय येथील NCC विद्यार्थी,विद्यार्थिनी , नेवासा तालुक्यातील कोतवाल, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षिक शेख यांनी प्रस्ताविक केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!