Wednesday, October 27, 2021

बापरे:व्हॉट्सअपद्वारे ऑन डिमांड सेक्स रॅकेट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.गौतमबुद्ध नगर पोलिसांच्या एंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटनं ही कारवाई केली आहे.

आरोपी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ऑन डिमांड सेक्स रॅकेट चालवत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून चार मुलींनाही ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचा दावा आहे की, आरोपी त्याच्या ग्राहकांच्या डिमांडनुसार मुली पुरवत होता. ग्राहक जिथे जिथे मुलींना फोन करुन बोलावयाचे, तिथे हा

आरोपी मुलींना गाडीतून सोडायला जायचा. तर कधीकधी मुलींना कॅबनंही पाठवले जायचं.आरोपी व्हॉट्सअ‍ॅप आणि इंटरनेटद्वारे ऑनलाईन बुकिंग करून सेक्स रॅकेटचा व्यवसाय चालवत होता. हे लोक ग्राहकांकडून एडवान्समध्ये ऑनलाईन पेमेंट घेतल्यानंतरच मुलींना त्यांच्याकडे पाठवायचे.

टोळीचा म्होरक्या सलमान नोएडाच्या सेक्टर 71 मधील स्क्वेअर मॉलजवळ राहत होता. हा मूळच उत्तर प्रदेशातील औरैयाचा रहिवासी आहे. सलमानला पोलीस स्टेशन सेक्टर -24 परिसरातील सारथी हॉटेल, सेक्टर 53 नोएडा येथून अटक केली आहे.

नोएडाचे एसीपी -2 रजनीश वर्मा म्हणाले की, ही टोळी इंटरनेट आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाद्वारे लोकांशी बोलतात आणि जेव्हा डील होते, तेव्हा हे लोक मुलींना हॉटेल, घरं, वाहनांद्वारे ग्राहकांकडे पाठवतात. तसंच ही टोळी ग्राहकांकडून मोठी रक्कम गोळा करतात. बऱ्याचंदा रोख पैसे गोळा केले जातात.

समोर आलेल्या माहितीनुसार, जवळपास 5,000 ते 20,000 रुपये ग्राहकांकडून घेतले जातात.पोलिसांनी आरोपीकडे असलेल्या 4 मुलीही ताब्यात घेतल्या. यात पश्चिम बंगालमधील दोन मुली, गाझियाबाद आणि दिल्लीच्या प्रत्येकी एका मुलीचा समावेश आहे.

चौकशी दरम्यान मुलींनी सांगितलं की, आरोपी त्यांना जबरदस्तीनं या सेक्स रॅकेटमध्ये आणत होते. आरोपींच्या टोळीत सामील असलेल्या इतर मुलींची सुटका करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. नोएडा पोलिसांच्या अनेक पथकांनी दिल्ली एनसीआरमध्ये छापा टाकला आहे

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!