Friday, October 22, 2021

आज पुन्हा सोने-चांदी दरात घसरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: : सोने-चांदी दरात सध्या घसरण सुरू आहे. अशात तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर आज ऑक्टोबर डिलीवरी सोन्याचा भाव 0.20 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरात 0.51 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मागील वर्षी 2020 मध्ये याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर सोन्याचा ऑगस्ट वायदे भाव 47,819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत सोनं जवळपास 8,381 रुपये स्वस्त झालं आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. त्याशिवाय देशात सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने सोन्याची मागणी वाढेल. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. ‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात

ताज्या बातम्या

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...
error: Content is protected !!