Monday, October 25, 2021

नगर मधील संतापजनक घटना:सैन्याचे गणवेश घालून नराधमांकडून लहान मुलावर अनैसर्गिक कृत्य

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराच्या सावेडी उपनगरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल रोडवर एक धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे.१३ वर्षाचा हा अल्पवयीन पीडित मुलगा सायकलीवरून घराकडे चालला होता. त्यावेळी लष्करी गणवेश परिधान केलेल्या आणि रस्त्याने चाललेल्या या अनोळखी व्यक्तीने त्याला

थांबविले. मुलाला थांबविणारे ही व्यक्ती प्रौढ होती. आदित्य, असे नाव सांगून “मै आर्मीवाला हू”, असेही सांगितले. येथील गॅरेजवर गाडी दुरुस्तीचे काम चालू असल्याचेही बतावणी त्याने केली. येथे लघुशंका करू शकतो का, अशी विचारणा केल्यावर मुलाने हो,

म्हणून सांगितले. त्यावर लष्करी गणवेश परिधान केलेले त्या प्रौढ व्यक्तीने मुलाच्या हातातील सायकल हिसकावून घेत ती खाली पडली आणि मुलाला रस्त्याकडेला असलेल्या काटवनात घेऊन गेला. तिथे त्या व्यक्तीने मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य केले.

या प्रकाराची वाच्यता कुठे केल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शंभर रुपये देत तेथून ही व्यक्ती पसार झाली, असे मुलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या कृत्याने नगर शहरात खळबळ उडाली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

प्रभारी शहर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, निरीक्षक ज्योती गडकरी यांनीही घटनास्थळी पाहणी केली. ही अनोळखी व्यक्ती कोण असेल, याचा शोध तोफखाना पोलीस घेत आहेत. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी भादवि ३७७, अनैसर्गिक

 अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच लैंगिक गुन्हापासून बालकांच्या संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!