Monday, October 25, 2021

सरकारने अतिवृष्टी मदतीचा पुनर्विचार करावा-जयाजीराव सूर्यवंशी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा(माय महाराष्ट्र न्यूज):– अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 4 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. सरकारने या मदतीचा पुनर्विचार करावा अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली आहे.

श्री.सूर्यवंशी पुढे म्हणाले की,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले सोयाबीन , मूग ,उडीद ,तूर ,बाजरी , खरीप ज्वारी या पिकांचे अवशेष शेतातून बाहेर काढण्यास ही हे एकरी दिलेले 4 हजार रुपये पुरणार नाहीत. मग ही मदत नक्की जमीन दुरूस्ती साठी आहे का ? पिकांचे नुकसान झाले आहे म्हणून आहे ?

एकरी 6 हजार रुपये फळबागेला देताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना विचार करण्याची गरज होती . लहान मुलांच्या सारखे वाढवलेली फळबाग या पावसात आडवी झाली आहे. ती उभा राहू शकत नाही . राज्य सरकारने बळीराजाला मदत देताना सन्मान पूर्वक मदतीची घोषणा करणे गरजेचे होते.

पण जे बोलतात ते काही करू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध करून दाखवले आहे . वेळ प्रसंगी शेतकर्यांच्यासाठी कर्ज काढू अशी भीम गर्जना करून दोन दिवस झालेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये. 2019 मध्ये फडणवीस सरकारने एक अध्यादेश काढून पश्चिम महाराष्ट्रातील

चार जिल्ह्यांना जिरायतीसाठी हेक्टरी 20 हजार 500, बागायतीसाठी 40 हजार 500 आणि फलबागेसाठी 54 हजार मदत जाहीर केली होती त्याच धर्तीवर सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी या प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या घोषणेमुळे सरकार शेतकऱ्यांच्या किती मागे हे सिद्ध होते.दोन दिवसांपूर्वी

  शेतकऱ्यांच्यसाठी महाराष्ट्र बंद करणारे हेच सरकार आहे का ? हा मोठा प्रश्न आहे .नुकसानीचे पंचनामे झाले असल्याचे पुनर्वसन मंत्रांचे म्हणणे साफ खोटे आहे असे ही सूर्यवंशी म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!