Monday, October 25, 2021

सोमनाथ कचरे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

कुकाणा

नेवासा तालुक्यातील कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कुकाण्यातील युवा नेतृत्व पत्रकार सोमनाथ कचरे यांची तर उपाध्यक्षपदी प्राप्ती सचिन बोरुडे यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच माता पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी सुरेखा शरद दरंदले तर शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी सचिन वसंत गोर्डे यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दौलतराव देशमुख हें होते व्यासपीठावर माजी सरपंच एकनाथराव कावरे, शालेय व्यवस्थापन समितीचे मावळते अध्यक्ष कैलास म्हस्के,युवा नेते अमोल अभंग, मुख्यध्यापक सुनील जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील गोर्डे, रज्जाक इनामदार, कारभारी गोर्डे, माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाने, पत्रकार इस्माईल शेख, चंद्रकांत कचरे, उमेश सदावर्ते, सचिन बोरुडे, यांच्यासह पालक उपस्थित होते.

व्यवस्थापन समितीत सदस्यपदी एकनाथराव कावरे (प्राधिकरण सदस्य ), रज्जाक इनामदार( शिक्षणतज्ञ्), देविदास गरड, अरुण फोलाने, राजश्री शिंदे, शबाना बागवान,मनीषा लोंढे,निशा गोर्डे, पूनम मानकेश्वर, रोहिणी म्हस्के, वैशाली भूमकर, सीमा सोनवणे (शिक्षक प्रतिनिधी ) सुनील जाधव (सचिव मुख्याध्यापक ) यांची वर्णी लागली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक सुनील जाधव यांनी केले तर आभार कैलास म्हस्के यांनी मानले.
या निवडीचे स्वागत सरपंच लताताई अभंग, उपसरपंच शुभांगीताई कचरे तसेच ग्रामपंचायत सदस्य मंडळाच्या व पालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!