Friday, October 22, 2021

महाराष्ट्रावर पुन्हा मोठ संकट:पुढील 4 दिवसांत मुसळधार पाऊस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरु आहे. गेले काही दिवस परतीच्या पावसाने अनेक प्रदेशात धुमाकुळ घातला आहे. कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे.

परिणामी या पावसामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान होत आहे. प्रादेशिक हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे राज्यातील अनेक भागात वीजांच्या गडगडाटासह पाऊस झाला आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा येत्या १६ ते १८ ऑक्टोबरपासून एकदा मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील आणि संलग्न मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात हा पाऊस पडणार असण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.हवामान खात्याने राज्यात नागपूरसह अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वाशीम, अकोला, बुलडाणा, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली,

या पंधरा जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात शनिवारी आणि रविवारी कोरड्या हवामानाची शक्यता आहे. वातावरणातील आर्द्रता हळुहळू कमी झाली की, त्यानंतर पावसाचा परतीचा प्रवास पुढच्या टप्प्यातून संपण्यासाठी वेळ लागत नाही.

काही दिवसांपासून सुरु झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, राज्यातील या काही भागातील नागरिकांना सचर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेतीची काही कामे तातडीने करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शनिवारी १६ ऑक्टोबर रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!