Friday, October 22, 2021

नगरचे पालकमंत्री सध्या किती पैसे आले व किती पैसे गेले याचा शोध घेत आहेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर स्वरूपाचे आरोपाचा आधार घेत हसन मुश्रीफ यांच्यावर खासदार सुजय विखे यांनी जोरदार टीका केली आहे .

पालकमंत्री सध्या त्यांचे बॅलन्स शीट चेक करत आहेत. ते त्यांचे अकाउंट बुक पाहत आहेत. नेमके किती पैसे आले आणि किती पैसे गेले याचा ते शोध घेत आहेत. ते एकदा सापडल्यानंतर पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात येथील अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

मागच्या काही दिवसापूर्वी भाजपा नेते किरीट किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. या आरोपानंतर हसन मुश्रीफ हे जिल्ह्यात केवळ एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते. तसेच त्यांनी नगर जिल्ह्यातील आपला दौरा रद्द केला होता.

याशिवाय नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याभागात ही हसन मुश्रीफ यांनी अद्याप भेट दिली नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना आज खासदार विखे यांनी मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली.ते म्हणाले, ‘मुश्रीफ यांना त्यांचे बॅलन्स शीट पाहू द्या.

अकाउंट बुक चेक करू द्या. नेमके किती पैसे आले, किती गेले हे एकदा कळू द्या. त्यानंतरच ते नगर जिल्ह्यात येतील,’ टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी अहमदनगर

जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,

प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड आदी सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघडीवर जोरदार टीका केली.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!