Friday, October 22, 2021

सुजय विखे म्हणतात मी लिहुन देतो त्याच्यांवर कारवाईचे धाडस दाखवणार नाहीत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:’दसऱ्याच्या निमित्ताने काही ठराविक लोकप्रतिनिधी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. काही तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी उद्या कार्यक्रम घेणार आहेत. या कार्यक्रमाला त्यांनी गर्दी केली, तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी करणार नाहीत, हे मी लिहून देतो,’ असे खासदार डॉ. सुजय विखे

यांनी स्पष्ट करतानाच आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला.अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणात सहभागी होण्यासाठी खासदार विखे आले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, ‘नगर जिल्ह्यातील गावांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय हा पूर्णता चुकीचा आहे. अनेक वेळा यावर वादविवाद झाले. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जास्तीतजास्त लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. गावेच्यागावे शंभर टक्के लसीकरण

कसे होतील, हे पाहिले पाहिजे. तसेच ज्या गावात ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लसीकरण झाले आहेत, त्यांना लॉकडाऊनची आवश्यकता नाही. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय पुढे कोणी जाऊ शकत नाही. हा निर्णय अन्यायकारक असला तरी कायद्याच्या विरोधात जाऊन आपल्याला बोलता येत नाही.

पण लॉकडाऊनची जी प्रक्रिया सुरू आहे, ती संपूर्ण देशात फक्त नगर जिल्ह्यातच आहे. नगर जिल्ह्यावर अन्याय करणारा हा निर्णय आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, दसऱ्याच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खर्डा येथेही आमदार रोहित पवार हे स्वराज्य ध्वज उभारणार आहे.

यावरूनही विखे यांनी अप्रत्यक्षरित्या पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘दसऱ्याच्या निमित्ताने काही ठराविक लोकप्रतिनिधी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. ते भाषणात तसे बोलतात सुद्धा. पण प्रशासनाचा पक्षपातीपणा सरसकट आढळून येतो. जिल्हाधिकार्‍यांनी निपक्ष राहून काम केले पाहिजे, ही अपेक्षा आहे.

पण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीच्या चुकीच्या कृतीवर सुरुवातीपासून कानाडोळा करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी यांनी दाखवलेले नाही. उद्या काही तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी यांनी कार्यक्रम घेऊन

गर्दी केली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी करणार नाही, हे मी लिहून देतो,’ असेही विखे म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!