Monday, October 25, 2021

नगर जिल्हा पुन्हा हादरला: २२ वर्षाच्या विवाहितेचा खून

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नावेळी ठरलेले हुंड्याचे पाच लाख रूपये न दिल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील अरणगाव येथे घडली. योगिता नीलेश दळवी (वय 22 रा. अरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

मयत योगिताचे वडिल देवराम आसाराम गव्हाणे (वय 52 रा. वडगाव गुप्ता ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.योगिताचा पती नीलेश बाळासाहेब दळवी, सासू आशा बाळासाहेब दळवी, सासरा बाळासाहेब रामभाऊ दळवी, भाया पप्पु बाळासाहेब दळवी, जाव मेघा पप्पु दळवी (सर्व रा. अरणगाव) अशी गुन्हा

दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. गव्हाणे यांच्या मुलीचे नीलेश दळवी याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नावेळी सासरच्यांनी पाच लाख रूपये हुंडा मागितला होता. हुंडा दिला नाही, म्हणून सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. योगिताने फोन करून माहेरच्या लोकांना हा प्रकार सांगितला होता.

योगिता तिच्या घरी असताना आरोपींनी तिला गळफास देवुन जीवे ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान योगिताला नगरमधील रूग्णालयात आणल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी तेथे गर्दी केली होती. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

घटनास्थळी कोतवाली पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसर्‍या दिवशी योगिताच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!