Monday, October 18, 2021

…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिवाळीसुद्धा अंधारात घालवू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अखेर ठाकरे सरकारने मदतीची घोषणा करत शेतकऱ्यांना १० हजार कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ही मदत कधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवाळीपूर्वी जर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही तर सर्व शेतकऱ्यांसह मातोश्रीवर जाऊ, असा इशारा बडनेरा मतदारसंघाचे

आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.यावेळी आमदार रवी राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यंदा निसर्गाने शेतकऱ्याला साथ दिलेली नाही. अतिवृष्टी, पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीसह पिकं आणि त्यांची घरे वाहून गेली. शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर आहे.

अमरावतीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना

त्यांच्या खात्यात पैसे मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता आली नाही तर मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असे राणा म्हणाले आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!