Monday, October 18, 2021

खा विखे म्हणतात लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णतः चुकीचा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, पारनेर, शेवगाव, राहुरी आदी तालुक्यांसह अनेक ठिकाणी मागील दीड महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या अतिवृष्टीचे पंचनामे देखील केले. मात्र शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही.

यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. हे आंदोलन अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा भूजलसर्वेक्षण कार्यालयासमोर सुरू होते.

या प्रसंगी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनावर जोरदार टीकेचा भडीमार केला.जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी 61 व आज 21 गावे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यावर खासदार डॉ. सुजय विखे

पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आज पुन्हा 21 गावे लॉकलाऊन झाल्याने खासदार विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णतः चुकीचा आहे.

अनेक वेळा यावर वाद-विवाद झालेले आहेत. यावर अनेक वेळा प्रशासनाला निवेदनेही दिलेली आहेत.जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणावर भर दिला पाहिजे. गावांतील सर्वांचे लसीकरण कसे होईल या दृष्टिकोणातून प्रयत्न केला पाहिजे. ज्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना लॉकडाऊनची अवश्यकता नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना कायद्याचे संरक्षण एवढे जास्त आहे की त्यांच्या पुढे कोणी काही करू शकत नाही. लॉकडाऊन करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. विखे पाटील यांनी दिला.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!