Monday, October 25, 2021

मंत्री प्राजक्त तनपुरे संतापले ही तर गंभीर बाब दोन महिन्यांत….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समिती सभागृहात ऊर्जा व आदिवासी खात्याशी निगडित प्रश्नांवर आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे,

तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व नंदकुमार दुधाळ, सभापती गीतांजली पाडळे, हरिदास शिर्के उपस्थित होते. आदिवासी विकास खात्याकडून खावटी वाटप करण्यात आले.अनेक महिने मागणी करूनही, बिघाड झालेले रोहित्र बदलून मिळत नाही. अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांकडून मोठ्या

रकमेची मागणी करतात. रिक्त पदांची समस्या असतानाच काही जण अनेक वर्षे जागीच बस्तान ठोकून आहेत, अशा आरोपांच्या फैरी सामान्य लोक झाडत असल्याने, आपल्याच विभागातील कारभार चव्हाट्यावर येत असल्याने हताश झालेल्या ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी, तुमच्या अशा वागण्याने ऊर्जा

खात्याची मान शरमेने खाली जात असेल तर ही बाब गंभीर आहे. दोन महिन्यांत कारभारात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला.उपस्थित अनेक नागरिकांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. टाकळी कडेवळीत येथील शेतकऱ्यांचे रोहित्र सहा महिन्यांपूर्वी जळाले.

वीजबिल भरूनही ते बदलून मिळाले नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर अधिकाऱ्यांनी नियम दाखवत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तनपुरे यांनी ही बाब गांभीर्याने घेत, मला कारणे सांगू नका, उद्याच्या उद्या संबंधित शेतकऱ्यांचे रोहित्रे बसवून तसा अहवाल आपणास पाठविण्याचा आदेश दिला.

सुरोडी येथील तरुण शेतकऱ्याने, रोहित्र बसविण्यासाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्याने ७० हजार रुपये घेतल्याचा आरोप केला. खोटे बोलत असेल तर माझी कुठल्याही अग्निपरीक्षेला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे त्याने सांगताच तनपुरे अवाक्‌ झाले. पाचपुते म्हणाले, की रोहित्रे बसविण्यासाठी पैसे द्यावे लागतात.

शेतकऱ्यांची पिळवणूक होते. वीज वितरणकडून जाणीवपूर्वक रोहित्रे उशिरा दिली जातात. ही बाब गंभीर असून, लोकांची पिळवणूक थांबली पाहिजे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!