Monday, October 18, 2021

दसर्‍याच्या दिवशी काही लोकप्रतिनिधींनींचा गर्दी जमविण्याचा घाट :खा. डॉ. विखे यांचा आरोप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगरमध्ये माध्यमांशी बोलताना खा.डॉ. सुजय विखे म्हणाले, जिल्ह्यातील गावांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय हा पूर्णता चुकीचा आहे. अनेक वेळा यावर वादविवाद झाले. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जास्तीतजास्त लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे.

गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. 80 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या गावात लॉकडाऊनची आवश्यकता नाही. मात्र जिल्हाधिकार्‍यांचा निर्णयापुढे कोणी जाऊ शकत नाही. लॉकडाऊनचा निर्णय अन्यायकारक आहे. लॉकडाऊनची ही प्रक्रिया या पद्धतीने फक्त नगर जिल्ह्यातच राबविली जात आहे.

खर्डा येथेही आमदार रोहित पवार यांनी स्वराज्य ध्वज कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खा.विखे यांनी त्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले, दसर्‍याच्या निमित्ताने काही ठराविक लोकप्रतिनिधी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. अशा कार्यक्रमांबाबत

प्रशासनाचा पक्षपातीपणा सरसकट दिसून येतो. जिल्हाधिकार्‍यां निपक्ष काम केले पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीच्या चुकीच्या कृतींकडे कानाडोळा केला जातो. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवत नाहीत. दसर्‍याला

काही तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी गर्दी जमवणार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवणार नाहीत हे मी लिहून देतो, असे खा.डॉ.विखे म्हणाले.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!