Saturday, September 23, 2023

शेतकऱ्यांनो: तुमच्या नुकसानीची माहिती या मोबाईल क्रमांकावर पाठवा; कृषिमंत्र्यांकडून नंबर जारी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अवकाळीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. गारपिटीनं झालेल्या नुकसानीनं बळीराज्याला अश्रू अनावर झाले.

दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवा असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

यासाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जाहीर केलेत. बंगला आणि कार्यालयातील मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेत. अवकाळी, गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती आणि फोटो

पाठवण्यात सांगितलं आहे.यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून 9922204367 आणि 02222876342 हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना तुमचं नुकसान झालं असेल तर

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन माहिती द्या असं यावेळी आवाहन करण्यात आलं आहे.राज्यात सलग पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने

वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागाला अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसला आहे.

अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीस आलेली असताना, अवकाळीचा फटका बसल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झालेत.

अशातच पुढील तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिली, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!