Wednesday, December 8, 2021

देवगड , नेवासा ,उस्थळ दुमाला , खरवंडी , शनीशिंगणापूर येथे होणार रेल्वे स्टेशन?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राहुल कोळसे :औरंगाबाद ते अहमदनगर या नव्या रेल्वेमार्गासाठी शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे . या मार्गावर नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार १७ रेल्वेस्टेशन निश्चित करण्यात आले असून या कामाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ( डीपीआर ) तयार करण्यासाठी डिसेंबरअखेरची डेडलाईन देण्यात आली आहे .

अनेक वर्षापासून औरंगाबाद ते नगर या रेल्वेमार्गाची मागणी केली जात आहे , परंतु राज्य व केंद्र सरकारने आता या मार्गाच्या कामाला गती दिली आहे . दोन वर्षापूर्वीच या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी एजन्सी देखील नियुक्त करण्यात आली होती .

या एजन्सीने रेल्वे मंत्रालय आणि शासनाला सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल देखील सादर केलाआहे . नुकतेच या मार्गावर रेल्वेस्टेशनवायत पाहणी करण्यात आली आहे . त्यानुसार १७ ठिकाणी रेल्वे स्टेशन देण्याचे नियोजन झाले आहेत . याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की ,

सध्या राज्य शासन या मार्गासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे . रेल्वे विभागाकडे देखील पाठपुरावा सुरू आहे . या मार्गामुळे पर्यटनासह औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला फायदा होणार आहे . तसेच जिल्ह्यातील पृष्णेश्वर मंदिर आणि नगरमधील साईबाबा मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात .

त्यांच्यासाठी देखील हा मार्ग लाभदायक ठरणार आहे . पहिल्या टप्प्यानंतर आता दुसरा टप्यातील कामाला गती आल्याचे देखील त्यांनी सांगितले .नियोजित स्टेशन अंबेलोहळ , येसगाव , बाबरगाव , गंगापूर , जामगाव , देवगड , नेवासा , उस्थळ दुमाला, खरवंडी ,

शनीशिंगणापूर , चिंचोर , मांजरसुंबा , वडगाव यासह इतर चार स्टेशनचा समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . यादरम्यान १३८ ठिकाणी १५ ठिकाणी ब्रिज राहणार आहेत .

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!