Wednesday, December 8, 2021

अत्यंत महत्त्वाची बातमी:पीएम आवास योजनेच्या नियमात मोठा बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारच्या ‘पीएम आवास योजनेंतर्गत तुम्हाला घर मिळालं आहे का? तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारनं ‘पीएम आवास योजनेच्या नियमांत मोठा बदल केला आहे.

पीएम आवास योजनेत तुम्हाला घर मिळालं असेल तर त्या घरात पाच वर्षे राहणं बंधनकारक असणार आहे. या नव्या नियमाचं तुम्ही पालन केलं नाही, तर तुम्हाला मिळालेलं घर रद्द होऊ शकतं. सध्या ज्या घरांना रजिस्टर्ड अ‍ॅग्रिमेंट टू लीज करून दिले जात आहे किंवा जे लोक हा अ‍ॅग्रिमेंट भविष्यात करतील, ते रजिस्ट्रीमध्ये नाही.

पीएम आवास योजनेत मिळालेली घरं लाभार्थी वापरत नाहीत. भाडेतत्वावर देतात ही बाब सरकारच्या लक्षात आली आहे. एकंदरीत या योजनेत मोठी हेराफेरी सुरू असल्याचं देखील निदर्शनात आलं आहे. आता यावर अंकूश ठेवण्यासाठी योजनेत मिळालेलं घर लाभार्थी वापरत आहेत की नाही

हे सरकार पाच वर्षे पाहणार आहे. तुम्ही संबंधित घरांत राह राहत असाल तरच या अ‍ॅग्रिमेंटला लीज डीडमध्ये बदलले जाईल. अन्यथा विकास प्राधिकरण तुमच्यासोबत केलेला अ‍ॅग्रिमेंटही संपुष्टात आणेल. त्याचबरोबर तुम्ही जमा केलेली रक्कम देखील परत केली जाणार नाही, असं सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहेत नव्या अटी आणि शर्ती?
– पीएम आवास योजनेअंतर्गत शहरी भागात बांधलेले फ्लॅट कधीही फ्री होल्ड होणार नाहीत.
– पाच वर्षांनंतरही लोकांना लीजवर राहावे लागेल.
– पीएम आवास योजनेअंतर्गत जे घर भाड्यानं घेत होते, ते आता बंद होईल.

– पीएम आवास योजनेतील लाभार्थ्याचा मृत्यू झाला, तर नियमानुसार, केवळ कुटुंबातील सदस्याला लीज हस्तांतरित केले जाईल.
– इतर कोणत्याही कुटुंबासोबत केडीए कोणतेही अ‍ॅग्रिमेंट करणार नाही.
– या अ‍ॅग्रिमेंटअंतर्गत लाभार्थ्यांना 5 वर्षे घरांचा वापर करणे बंधनकारक आहे. यानंतर घरांचे लीज दिले जाईल.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!