Wednesday, December 8, 2021

कोरोना वाढणार ? नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून आज जामखेड येथे स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापणा होत आहे. शिवपट्टण किल्ला परिसरात हा कार्यक्रम पार पडतो आहे.

पण, गेल्या १२ दिवसांपूर्वीच नगरमधील तब्बल ६१ गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर आज रोहित पवारांच्या कार्यक्रमात झालेली गर्दी पाहून नगरमधील कोरोना कमी झाला की काय ?.नगरमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे काही तालुक्यातील ६१ गावांमध्ये हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.

या नियमावलीनुसार, गावामधअये पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामध्ये स्वतः आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कर्जतमधील दोन गावांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून सर्व कार्यक्रम केला जाणे अपेक्षित आहे.

पण, आज रोहित पवारांच्या कार्यक्रमामध्ये हजारो लोकांची उपस्थित दिसली. सरकारने नियम शिथिल केले असले तरी अजूनही मास्क वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पण, या कार्यक्रमामध्ये अनेकांच्या तोंडावर मास्कही दिसत नव्हते. त्यामुळे कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या

अहमदनगरमधील कोरोना पूर्णपणे गेला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमका काय आहे कार्यक्रम? रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघामध्ये शिवपट्ट्ण किल्ला परिसरात 74 मीटर उंच भगवा फडकविण्यात आला आहे. आमचा ध्वज सर्वसमावेशक आहे.

जात-धर्म-पंथांच्या पलिकडे जाणारा आमचा ध्वज आहे, असं रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!