Friday, December 3, 2021

IPL 2021 Final : ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ;पण तो आहे महाराष्ट्रातील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:IPL च्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम सामन्यात KKR च्या बॉलर्सची धुलाई करत १९२ धावांचा डोंगर उभा केला आहे. फाफ डु-प्लेसिस ८६ धावांच्या इनिंगच्या जोरावर चेन्नईने हे आव्हान कोलकात्यासमोर उभं केलं. या इनिंगमध्ये चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आपल्या छोटेखानी इनिंगमध्ये ऑरेंज कॅपचा मान पटकावला आहे.

केकेआरविरुद्धच्या फायनल मॅच आधी ऋतुराजने या हंगामात ६०३ धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलच्या मागे होता. राहुलने या हंगामात ६२७ धावा केल्या आहेत. पण ऋतुराजने या सामन्यात ३२ धावा करत राहुलला मागे टाकले आणि ऑरेंज कॅप स्वत:च्या नावावर केली.

याचसोबत ऋतुराजने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा तो सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. याआधी पंजाबच्या शॉन मार्शने २५ व्या वर्षात २००८ साली ऑरेंज कॅप मिळवली होती. ऋतुराजने वयाच्या २४ व्या वर्षी हा विक्रम करुन दाखवला.

महत्वाची गोष्ट म्हणजे फाफ-डुप्लेसिसलाही ऋतुराजचने मिळवलेला ऑरेंज कॅपचा मान आपल्या नावावर करण्याची संधी होती. परंतू ५९ बॉलमध्ये ७ फोर आणि ३ सिक्स लगावून डु-प्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दोन रनने मागे पडला.

भारतीय क्रिकेटपटू गायकवाड यांचा जन्म 31 जानेवारी 1997 ला पुणे महाराष्ट्र मध्य झालेला आहे. साध्या गायकवाड 2021 च्या मध्यावर वयाच्या 24 व्या वर्षी आला आहेत. गायकवाड हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे जो महाराष्ट्र भारत आणि चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट खेळतो.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!