Saturday, November 27, 2021

थोरातांचा नगर जिल्ह्यातील या बड्या नेत्याला टोला;काहींनी शपथविधीसाठी कपडेही शिवले होते…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 55 व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते.निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. या कामासाठी आता निधी

आल्यामुळे हे काम आता प्रगतीपथावर आहे. या कामासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचे वक्तव्य करताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.ते पुढे म्हणाले, काही जण आमच्यावर सातत्याने राग काढतात. समन्यायी पाणी वाटपावर आम्ही बोलत होतो,

मोर्चे आंदोलने करीत होतो. त्यावेळी ते घरात लपून बसले. निवडणुकीपूर्वी दोन महिने अगोदर राज्याची जबाबदारी खांद्यावर पडली. जनतेचे प्रेम आणि आशीर्वादामुळे पहिल्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले. काहींनी शपथविधीसाठी नवीन कपडेही शिवले होते म्हणतात अशी मिश्किल टिपण्णी थोरात यांनी केली.

राज्यात चांगला मान मिळतो, सध्या फक्त तीनच फोटो चालतात हे पहावत नसेल तर काळा गॉगल वापरा असा सल्लाही थोरातांनी विरोधकांना दिला. आपण जनता व विचारांशी कायम प्रामाणिक राहिलो. सर्व सामान्यांच्या सर्वांगीण विकासाच्या हेतूने मिळालेल्या संधीचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करतोय.

संगमनेरातल्या रस्त्यांविषयी काय बोलता.. 2013 साली बायपास झाला होता. राहाता तालुक्यातल्या शिर्डी ते नगरचा रस्ता पहा.. माणसाचे मणके आणि गाड्याही मोडतात असा टोला थोरातांनी लगावला.काहीजण विरोधी पक्षनेते असताना मुख्यमंत्र्यांच्या जवळ होते. तरीही राष्ट्रीय महामार्गासाठी आम्ही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना साकडे घातले. देशात संगमनेरच्या सहकाराची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारने विनाअट कर्जमुक्ती दिली. कोरोना काळात प्रामाणिक काम केले. मृत्यूचे आकडे लपविले नाही. उलट हिंदुत्वाच्या नावावर मते मागणार्‍यांच्या राज्यात हिंदूंचे मृतदेह गंगेकाठी आढळले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!