नेवासा(तालुका प्रतिनिधी):–
अधिच कोरोनामुळे वाया गेले अडीच-तीन आणि आता शिक्षकांचा संप यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी फत्तेपुरचे माजी सरपंच व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावातील शाळाच सुरु केली आहे.
गेल्या आठ दिवसापासून चालू असलेल्या शिक्षकांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान होत आहे ते भरून काढण्यासाठी एक आगळा-वेगळा निणर्य
फत्तेपुरचे माजी सरपंच व ग्रामस्थांनी घेतला.
फत्तेपूर येथे असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे चार वर्ग आहेत. सरपंच-ग्रामस्थांनी शाळाच सुरू करून जोपर्यंत शिक्षक कामावर हजर होणार नाहीत तोपर्यंत गावकरीच शाळा सुरू ठेवून मुलांना शिकविण्याचे काम करतील असा निर्णय घेऊन शनिवार दि.१८ मार्च रोजी शाळा ही भरविली.विद्यार्थ्यांनी या झाडां खालच्या शाळेला प्रतिसाद दिला.
यावेळी माजी सरपंच तुळशीदास शिंदे,शालेय व्यवस्थान समिती सदस्य अमोल शेळके ,दिगंबर फरताळे,प्रवीण धुमाळ,सोमेश्वर जह्राड,भोलेनाथ धुमाळ,उदय धुमाळ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.शाळेच्या पहिल्या दिवशी स्वत: सरपंच तुळशीदास शिंदे व कु.पदमा शेराकर हिने शिक्षक म्हणून काम केले.
*मुलांचे शैक्षणिक नुकसान बघवत नाही…*
कोरोना काळात मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे आणि आता शिक्षकांनी संप पुकारलेला आहे.संप कधी मिटेल याची शास्वती नाही.शाळा बंद असल्याने मूल घरी अभ्यास न करता गावात इकडे-तिकडे हिंडतांना दिसतात, त्यांचे होणार शैक्षणिक नुकसान बघवत नाही.त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी आम्ही गावातील शाळा सुरु ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे.मुलांना शिकविन्या करिता गावातील सुशिक्षित पदविधर तरुण-तरुणीचे सहकार्य मिळत आहे.
–तुळशीदास शिंदे
माजी सरपंच,फत्तेपुर,ता.नेवासा