Tuesday, November 30, 2021

महसूलमंत्री थोरातात म्हणतात नैराश्यामुळे ते बोलत आहेत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५५ व्या गाळप हंगामास शुक्रवारी मंत्री बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, रणजिर्तंसह देशमुख, इंद्रजीत थोरात आदी उपस्थित होते.निळवंडे धरण पूर्ण केल्यानंतर आता कालव्यांची कामेदेखील पूर्णत्वाकडे जात आहेत. राजकारणात आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असल्याने यश मिळत आहे.

राज्यात संगमनेरला मोठा सन्मान मिळू लागल्याने काही लोकांना त्याचा त्रास होत आहे. नैराश्यामुळे ते बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसल्याची टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता केली.

राज्यात संगमनेरचा लौकिक झाला आहे. हे सहन होत नसल्याने काही लोक टीका करत आहेत, त्यांना फारसे महत्त्व देऊ नका. आपल्याला महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हे येथील जनतेचे श्रेय आहे. राज्यात कुठेही आज तीन फोटो दिसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपला हा आपल्या संगमनेरच्या

जनतेचा गौरव आहे. यामुळेही काही लोकांना त्रास होतो.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांची जवळीक असलेल्या नेत्यांनी संगमनेरऐवजी शिर्डी-नगर रस्त्याची अवस्था बघावी. या रस्त्याबाबत त्यांनी चिंता करावी. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गाड्याच नव्हेतर नागरिकांची हाडे, कंबरडेदेखील मोडली आहेत.

करोना काळात कोणतेही आकडे लपविले नाहीत. याउलट हिंदुत्वाच्या नावावर मते मागणाऱ्यांच्या राज्यात हिंदूंचे मृतदेह गंगेच्या काठी बघायला मिळाले. उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडले गेले. देशात भांडवलशाही आणण्यासाठी तीन काळे कायदे लागू केले गेले. असे थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!