Friday, December 3, 2021

महाराष्ट्रातील मोठी बातमी:’अजित पवारांचा अडचणीत वाढ, 184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना घाम फोडला आहे. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी १८४ कोटी रुपयांचे बेनामी संशयास्पद व्यवहार झाल्याचं सांगताना यामध्ये

महाराष्ट्रातील प्रभावशाली कुटुंबाचा सहभाग असल्याचं म्हटलं होतं. यावरून सोमय्या यांनी हा अजित पवार घोटाळा असल्याचं म्हटलं आहे. सोमय्यांनी ट्विट करत थेट अजित पवार यांचे नाव घेतले आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर म्हटलं की, अजित पवार घोटाळा9 दिवसांचे आयकर छापेमुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर… 70 ठिकाणी छापे१००० हून अधिक कोटींचे जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने….कोट्यवधी रुपये रोख आणि ज्वेलरी184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहारप्राप्तिकर

विभागाने काही दिवसांपूर्वी मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर छापा टाकला होता. यावेळी तपासादरम्यान काही कागदपत्रे जप्त केली होती. तसंच, या समूहांशी संबंधित काही व्यक्तींचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती. यामध्ये १८४ कोटींची बेनामी संपत्ती समोर आल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे सांगण्यात आलं.

तसंच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे असंही सांगण्यात आलं की, यामध्ये महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाचाही सहभाग आहे.पीटीआयच्या वृत्तानुसार, या दोन्ही समूहाकडे 184 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले आहेत. ज्या दिवशी अजित पवार

यांच्या बहिणीच्या घरी छापेमारी करण्यात आली होती, त्यावेळी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. आपल्या तिन्ही बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. कोल्हापूर आणि पुण्यात अजितदादांच्या दोन बहिणी राहतात. या छापेमारीत 2.13 बेहिशोबी मालमत्ता

आणि 4.32 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. बनवावट शेअर प्रीमियम, संदिग्ध असुरक्षित कर्ज, काही माध्यमातून मिळवलेला निधी, आदी विविध मार्गाने ही रक्कम जमा करण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचा दावा सीबीडीटीने केला आहे.

राज्यातील एका प्रभावशाली नेत्याच्या कुटुंबीयांकडे ही संपत्ती सापडल्याचं सीबीडीटीने म्हटलं आहे. सीबीडीटीने प्रेस रिलीजमध्ये अजित पवारांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी ही संपत्ती अजित पवार यांच्या नातेवाईकांकडेच सापडल्याचे संकेत दिले आहेत. ही बेहिशोबी संपत्ती मुंबईतील कार्यालय,

दिल्लीत एका पॉश परिसरात फ्लॅट, गोव्यात रिसॉर्ट, महाराष्ट्रात शेत जमीन आणि साखर कारखान्यात गुंतवण्यात आली होती. या सर्व बेहिशोबी मालमत्तेची किंमत 170 कोटीच्या जवळपास असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!