Friday, December 3, 2021

नगर जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुली फूस लावुन नेल्या पळवुन..?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील कोपरगावं तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतून व कोपरगावं बेट येथून दोन अल्पवयीन मुली अनुक्रमे ०९ व दि.१४ ऑक्टोबरच्या दिवशी अज्ञात व्यक्तीने फूस लावुन पळवून नेल्या असल्याचे दोन स्वतंत्र गुन्हे फिर्याद मुलीच्या

मातानीं कोपरगावं शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने नगर जिल्हात खळबळ उडाली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की,मी आणि माझी मुलगी आमच्या परिवारासह दि.०९ ऑक्टोबरच्या रात्री झोपी गेलो असता रात्री दहा वाजेनंतर ते पहाटे ०३ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीस फूस लावून पळवून नेले आहे.

हि बाब त्यांना सकाळी झोपेतून जाग आल्यावर समजून आली.त्यांनी या घटने बाबत तातडीने कोपरगावं तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तर दुसऱ्या घटनेत कोपरगाव बेट येथील एक व्यापारात गुंतलेल्या कुटूंबातील आई दुकानावर आल्यावर दि.१४ ऑक्टोबर

रोजी सायंकाळी ०५ वाजता सदरची अल्पवयीन मुलगी आपल्या घरातुन अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवुन नेली आहे.या दोन्ही घटना घडल्या ठिकाणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेटी दिल्या आहेत. त्याचबरोबर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील केला आहे.

जिल्ह्यात खळबळ माजवणार्या या घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!